राष्ट्रीय क्रमवारीत वायसीसीईला मानाचे स्थान

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नागपूर,
YCCE Nagpur यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई), नागपूरने इंडिया टुडे आणि डेटाक्वेस्ट २०२६च्या राष्ट्रीय क्रमवारीत उल्लेखनीय स्थान मिळवत शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर छाप पाडली आहे.इंडिया टुडे रँकिंग २०२६मध्ये वायसीसीईला भारतातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या श्रेणीत ८७वा, तर डेटाक्वेस्ट रँकिंग २०२६मध्ये खासगी टी-स्कूल्स (तंत्रज्ञान शिक्षण संस्था) श्रेणीत ३९वा क्रमांक मिळाला आहे.
 

ycc  
 
 
ही मानांकने वायसीसीईच्या गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, उद्योग-शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची पावती मानली जात आहे. या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि कर्मचारीवर्ग यांनी आनंद व्यक्त केला असून, भविष्यातही शैक्षणिक उत्कृष्टता आणि संशोधनाला अधिक बळ देत सक्षम अभियंते घडविण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे .
सौजन्य :राजेन्द्र पहाडे,संपर्क मित्र