कसोटी संघ मंगळवारपर्यंत जाहीर होणार

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |

 

नवी दिल्ली
sri-lanka-tour अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पुरुष निवड समिती श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ मंगळवारपर्यंत जाहीर करेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी शनिवारी दिली.

devjit saikiya 
 
 
 

sri-lanka-tour आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेअंतर्गतच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळणार आहे. मंगळवारपर्यंत आम्ही कसोटी संघाची घोषणा करू, असे सैकिया यांनी सांगितले.

 
sri-lanka-tour पहिला कसोटी सामना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान निसर्गरम्य गॅले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाईल. दुसरा आणि अंतिम कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान कोलंबोमधील सिंहालीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळविला जाईल. भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी कोलंबोत दाखल होईल आणि ७ ते १० ऑगस्ट दरम्यान कोलंबोमधील नॉन-डिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर चार दिवसांचा सराव सामना खेळेल.
 

sri-lanka-tour संघातील बहुतांश खेळाडू तेच राहणार असले तरी, भारतासाठी मुख्य चिंतेचा विषय म्हणजे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑफ-स्पिन अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांची स्थिती आहे.