नागपूर,
2026 Ashadhi Ekadashi गणपती-हनुमान मंदिर, हावरापेठ येथे आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे मंगलस्नान, अभिषेक व पूजन नरेंद्र पौनिकर व संगीता पौनिकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात भजन, हरिपाठ, हनुमान चालीसा पठण व महाआरती झाली. भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास मंदिराचे पदाधिकारी, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:रमेश मेहर ,संपर्क मित्र
अत्रे ले-आऊटमध्ये विठ्ठल-रुक्मिणी पालखी सोहळा उत्साहात
आषाढी एकादशीनिमित्त अत्रे ले-आऊट येथील राजराजेश्वरी मंदिरातून विठ्ठल-रुक्मिणीची पालखी भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. परिसरात विठ्ठल नामाच्या गजरात वारी पार पडली. महिला-पुरुषांनी टाळ, शंख वाजवत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मंदिराचे अध्यक्ष दिनकरराव जोशी, सचिव चंद्रकांत शहा, कोषाध्यक्ष प्रशांत व्यास तसेच अड्डूलवार,आवळे, वणीकर यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.
सौजन्य :संदीप देव,संपर्क मित्र