अर्जुनी-मोरगाव-सिरोली-महागाव रस्ता होणार दर्जेदार

आ. बडोले यांच्या प्रयत्नाला यश

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव
chief-ministers-gram-sadak-yojana गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळत असलेल्या अर्जुनी-मोरगाव, निलज, मालकनपुर, माहुरकुडा ते सिरोली महागाव या मुख्य रहदारीच्या रस्त्याला अखेर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्याची अधिकृत माहीती प्राप्त झाली आहे. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होणार आहे. या रस्त्यासाठी आमदार ईंजी. राजकुमार बडोले यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या या प्रत्नांना यश आले आहे.
 
gram sadak yojana
 
chief-ministers-gram-sadak-yojana अर्जुनी-मोरगाव, ते सिरोली महागाव ते बोरी हा 28 कि. मी. रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दयनिय अवस्थेत आहे. या रस्त्याच्या डागडूजी व मजबुतीकरणासाठी अनेकांनी अर्ज निवेदने संबधित यंत्रणा व लोकप्रतिनिधींना यापूर्वीच दिले आहे. सध्या हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच झाला आहे. यावर्षी या रस्त्यानी जाणार्‍या एस. टी बसेस सुध्दा बंद करण्यात आलेल्या आहेत. वाहन, सायकल सोडाच या रस्त्यावरुन पैदल चालनेही कठीन झाले आहे. या रस्त्यावरुन अनेक अपघातही झाले आहेत. जि. प. अंतर्गत येत असलेल्या या 28 कि. मी. रस्त्याचे मजबुतीकरणासाठी निधी ची फार अडचण निर्माण होत होती. अनेकदा जि. प. च्या माध्यमातुन थातूरमातूर दुरुस्तीचे कामे केली जायची, याबाबत परिसरातील अनेक नागरीकांनी या विभागाचे आ. बडोले यांचेकडे अडचणी मांडल्या.
 
chief-ministers-gram-sadak-yojana आ. बडोले यांनी जनतेच्या अडचणी लक्षात घेवून हा रस्ता पहिल्यांदा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत हस्तांतरीत केला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 12 किमी. रस्ता मजबुतीकरण कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहीती आहे. सदर रस्त्याचे सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून या संपूर्ण कामाचे अंदाजपत्रक तयार करुन प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे काम सुरु आहे. बर्‍याच वर्षाचे कालावधीनंतर या कामाला प्राधान्यक्रमाने मंजुरी मिळविण्यासाठी आ. बडोले यांनी जिकरीचे प्रयत्न केल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.
 
तात्पूरता रस्ता दुरुस्त करा...
chief-ministers-gram-sadak-yojana अर्जुनी-मोरगाव, निलज मालकनपुर माहुरकुडा ते महागाव बोरी या रस्त्याचे मजबुतीकरण कामाला मंजुरी मिळाली असली तरी वर्ष दिड वर्ष हे काम पूर्णत्वास जाणार नाही, तेव्हा एसटी बसेस बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनींना अर्जुनी-मोरगाव येथे शाळेत जाणे कठीण झाले आहे. त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून हा रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्याची मागणी निलजचे उपसरपंच नंदकिशोर गहाणे तसेच मालकनपुरचे सामाजिक कार्यकर्ते नरेश खंडाईत यांनी केली आहे.