पाकिस्तान पुरस्कृत समाज माध्यम खात्यांवर बंदी

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ban on pakistan sponsored accounts राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कॉक्रोच पार्टी आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर समाज माध्यमांवर अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि बनावट आशय प्रसारित करणाऱ्या ४०० पेक्षा जास्त कथित पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटविण्यात आली असून, त्यांच्यावर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
 
 
ban on pakistan sponsored accounts
 
दिल्ली पोलिसांचे उपायुक्त (डीसीपी) सुमित झा यांनी सांगितले की, या समाज माध्यम खात्यांचा वापर सध्याच्या आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर अफवा पसरविण्यासाठी केला जात आहे. यापैकी अनेक खाती ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही सक्रिय होती. आतापर्यंत ४०० पेक्षा जास्त पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटली आहे. ही खाती खोटी माहिती आणि अफवा पसरवून जनतेला भडकविण्याचा तसेच, युवकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा खात्यांवर कारवाई सुरू असून, नागरिकांनी कोणतीही माहिती पडताळणीशिवाय शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.