बँक ऑफ बडोदाचा ११९ वा स्थापना दिन साजरा

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
नागपूर ,(सावनेर )
Bank of Baroda बँक ऑफ बडोदाचा ११९ वा स्थापना दिवस सावनेर शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाखेची आकर्षक सजावट करण्यात आली. दीपप्रज्वलन, राष्ट्रगीत, केक कापून ग्राहकांना मिठाई वाटप करण्यात आले.

rss  
 
कार्यक्रमाला डॉ. शशांक जैन, ॲड. अभिषेक मुलमुले, धनंजय मुलमुले, इंद्रपाल नवधींग, ॲड.पल्लवी मुलमुले व ॲड. जयंत मुलमुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी बँकेच्या ११९ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करत डिजिटल बँकिंग व विविध ग्राहकाभिमुख योजनांची माहिती दिली.शाखा व्यवस्थापक अमोल शोषराव बोडखे व सहाय्यक शाखा व्यवस्थापक खुशबू गडपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता चहा व अल्पोपहाराने झाली.
सौजन्य:धनंजय मुलमुले,संपर्क मित्र