bhargavastra ऑपरेशन सिंदूर जेव्हा भारतीय सैन्याने राबविले तेव्हा ती लढाई तंत्रज्ञानावर आधारित होती. भारतीय लष्कर एवढे प्रगत तंत्रज्ञान सहजतेने हाताळू शकते, याची प्रचीती संपूर्ण जगाला आली. आता त्यातच एक पाऊल पुढे टाकत येणाऱ्या काळात भारतीय लष्करात भार्गवास्त्र सहभागी होणार आहे. ज्या भागात याची व्यवस्था केली त्याच्या आसपासच्या १० किलोमीटर परिघातील ड्रोन शोधणारी रडार यंत्रणा भार्गवास्त्रात बसविण्यात आली आहे. यामुळे शत्रूचे ड्रोन सहजतेने नष्ट करण्याची ताकद यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

bhargavastra भार्गवास्त्राची निर्मिती नागपुरातील सोलर इंडस्ट्रिजने केली आहे. शत्रूच्या ड्रोनच्या थव्यांना नष्ट करता येईल. याची प्रभावी हल्ला करण्याची क्षमता सुमारे ६ किलोमीटर आहे. यातील प्रणाली पूर्णत: स्वदेशी आहे. भार्गवास्त्र वाहनावर सहजपणे बसवता येते. कुठेही तैनात करता येईल. अचूक लक्ष्य साधण्याची कुवत असल्याने मारक क्षमता उत्तमच आहे. समुद्रसपाटीपासून ५ हजार मीटर उंचीच्या पर्वतीय प्रदेशातही तैनात केली जाऊ शकते.