मानोरा
cement road तालुयातील तीर्थक्षेत्र पोहरादेवीला नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरला जोडणार्या धानोरा-पोहरादेवी-सिंगद-काळी-दौलत-दहिसावळी-माहूर या महत्वाच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
रस्त्याच्या एका बाजूला नवीन सिमेंटचा रस्ता पूर्ण झाला आहे. पेव्हर मशीनच्या साहाय्याने रस्त्याचे काम सुरू असून, दुसर्या बाजूला मुरमाचा कच्चा रस्ता तयार होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, शेती व झाडे असून ग्रामीण भागातील हा रस्ता आता आधुनिक होत आहे. हा रस्ता वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांचे समाधीस्थान व नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुकामाता मंदिर या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडतो. सध्या पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होत असल्याने भाविकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रामनवमी यात्रा व इतर सणांना लाखो भाविक पोहरादेवीला येतात. सिमेंट रस्ता झाल्याने प्रवास सुकर होणार आहे. धानोरा, सिंगद, काळीदौलत, दहिसावळी परिसरातील शेतकर्यांना शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी चांगला मार्ग मिळेल. जीर्ण रस्त्यामुळे होणारे अपघात कमी होऊन वाहतूक सुरक्षित होणार आहे. स्थानिक नागरिक व भाविकांनी या कामाचे स्वागत केले आहे. प्रशासनाने काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.