दिल्ली
cjp ends jantar mantar protest कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता CJP ने आंदोलन मागे घेतले आहे. CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी सरकारसोबत त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर सहमती झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह हेही हजर होते.
सरकारने आंदोलकांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या?
१. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
२. नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई.
३. आंदोलकांवर कोणतीही कारवाई नाही; दाखल झालेल्या कोणत्याही एफआयआर रद्द केल्या जातील.
चार आठवड्यांनंतर पुन्हा बैठक होणार
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली. यानंतर, एका संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. तसेच, सीजेपीचे प्रवक्ते चार आठवड्यांनंतर केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा भेटतील, असेही जाहीर करण्यात आले. या बैठकीत त्यांनी देशाची शिक्षण व्यवस्था आणि नीट पेपरसह इतर स्पर्धा परीक्षांच्या सुधारित आयोजनावर चर्चा केली.