पंढरपूर
cm devendra fadnavis आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक दाखल झाले आहेत. आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत भक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंपरेनुसार आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची विधिवत पूजा केली.
आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब महादेव माने आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती बाबासाहेब माने या दाम्पत्याला मिळाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत आषाढी यात्रेचे महत्त्व, वारकऱ्यांची श्रद्धा आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
“आपल्या भक्तांसाठी विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. यावेळी २५ किलोमीटरची रांग आहे, त्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही निमंत्रणाशिवाय भक्त पायी प्रवास करून येतो. ही माझी पूजा नाही, ही विठ्ठल भक्तांची पूजा आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे. तो सर्व प्रकारच्या क्षेत्रांतून येणारा वारकरी आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयांचाही उल्लेख केला. “या वर्षी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. वीजबिल माफ केली. सर्वांना विनंती आहे की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी अनेक लोक येतात. कितीही लोक आले तरी आता योग्य नियोजन केले जाणार आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारसाठी विठ्ठलाकडे cm devendra fadnavis काय मागितले, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सरकारसाठी काही मागायची गरज नाही. त्याला आपल्या मनातले सर्व समजते. राज्यात चांगला पाऊस व्हावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्याच्या जीवनात आनंद मिळावा, हीच इच्छा आहे. मोदींनी दिशा देण्याकरता नवा अध्यास सुरू केला आहे, त्यालाही आशीर्वाद मिळावा.”पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “यावर्षीच काम सुरू झाले पाहिजे. दोन ते अडीच वर्षांत काम पूर्ण होणार आहे. कॉरिडॉरनंतर पंढरपूरला वेगळे रूप प्राप्त होणार आहे.”
पंढरपूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात किती जिल्हे करायचे, विठुराया जेव्हा आदेश देणार तेव्हा आम्ही करू.”
दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “प्रश्नावर गांभीर्याने आंदोलन करणारे आहेत. तसेच राजकारण आणि हिंसाचार करणारे, जाणूनबुजून अराजकता निर्माण करणारेही तिथे दिसतात.”
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकशाहीतील अधिकाराचा उल्लेख केला. “सर्वांना लोकशाहीत आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकारणात आपली जागा कशी निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्न आहे. पण माझ्या त्यांना त्यासाठी शुभेच्छा आहेत,” असे ते म्हणाले.