विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान

सर्पमित्र मयुरेश मानधणे यांचे कौतुक

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
वाशीम,
cow rescued  शहरातील सुंदर वाटिका परिसरात २४ जुलै रोजी सकाळच्या सुमारास एक गाय सुमारे ६० ते ७० फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच सर्पमित्र मयुरेश मानधणे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची सूत्रे हाती घेतली. मानधणे यांनी तातडीने गौरक्षकांशी संपर्क साधून क्रेनची व्यवस्था केली. त्यानंतर विहिरीत उतरून गाईला सुरक्षितरित्या पट्टा बांधण्यात आला. रोहित सहस्रबुद्धे, सचिन भालेराव आणि गणेश चव्हाण यांनी जीवाची पर्वा न करता क्रेनच्या साहाय्याने रेस्यू ऑपरेशन यशस्वी करत गाईला सुखरूप बाहेर काढले.
 

washim cow rescue news, animal rescue washim, mayuresh mandhane snake rescuer, cow trapped in well, washim latest news, wildlife rescue india, animal welfare news, brave rescue operation, crane rescue mission, snake rescuer maharashtra, washim city news, social service story, animal protection 
या बचावकार्यात बबलू शर्मा, महेश दायमा, अजय चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण, गौरव धांडुरे यांच्यासह अनेकांनी मोलाचे सहकार्य केले.विशेष म्हणजे, बचावकार्य सुरू असताना विहिरीत विषारी सापही आढळून आले. मात्र, या धोयाची पर्वा न करता सर्पमित्र मयुरेश मानधणे आणि अनंतराव देशमुख यांनी धाडसाने संपूर्ण बचाव मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या तत्परतेमुळे मुया जीवाला नवजीवन मिळाले. या धाडसी आणि संवेदनशील कार्याबद्दल सर्पमित्र मयुरेश मानधणे व त्यांच्या सहकार्‍यांचे वाशीम शहरातून सर्वत्र कौतुक होत असून, मुया प्राण्यांप्रती दाखविलेल्या सेवाभावाला नागरिकांनी सलाम केला आहे.