हिंगणघाट जिल्हा घोषित करा

डोंगरे यांची मागणी

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट,
declare hinganghat हिंगणघाट उपविभागाला जिल्हा म्हणून मान्यता देण्यात यावी, शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक सुरू करण्यात यावे, बाजारात स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यात यावी व दलित वस्ती निधीची चौकशी करण्यात यावी, आदी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना राकाँ (शप) पक्षाच्या नेत्या व माजी नगरसेवक शुभांगी डोंगरे यांनी निवेदनातून केली आहे.
 
 
declare hinganghat
 
निवेदनातून त्यांनी शहरातील विविध समस्याची दखल पालकमंत्री म्हणून घेण्याची विनंती केली. येथील शाळा, महाविद्यालये परिसरात मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक स्थापन करून पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, शहरातील बाजारपेठ, मुख्य मार्ग, बसस्थानक आदी ठिकाणी स्वच्छ प्रशासनगृहाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.declare hinganghat हिंगणघाट नप अंतर्गत येणार्या दलित वस्ती निधी हा दलित वस्तीत खर्च न करता अन्यत्र खर्च झाला या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी आ. समीर कुणावार, अॅड. सुधीर कोठारी, नप अध्यक्ष नयना तुळसकर, आदी उपस्थित होते.