नागपूर,
deen-dayal-research-institutebaljagat दीनदयाल शोध संस्थानच्या बालजगत येथे आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी उत्साहात काढण्यात आली. बालगुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या गजरात दिंडीत सहभाग घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले. मुलांनी फेर धरत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी विद्यार्थी अभीराम मोहरिर व गौरीका सालपेकर यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. पल्लवी वखरे यांनी आषाढी एकादशीची माहिती व गोष्ट सांगितली. आरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला बालजगतचे अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे, सचिव संजय भाकरे, माधवी जोशीराव, वैशाली दामले, मंजिरी घाटे,. विनंती पाठक, वैशाली कढव तसेच संयोजिका, कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य :निकिता लुटे,संपर्क मित्र