४ वर्षांपासून फरार महिला आरोपी अटकेत

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
female accused खून प्रकरणात न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वीच फरार झालेल्या मुख्य महिला आरोपीला गुन्हे शाखा-३ च्या पथकाने तब्बल चार वर्षांनंतर अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लावा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अश्विनी सूरज देशभ्रतार (३२) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 

female accused 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये कळमना पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, पोक्सो कायदा तसेच इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची तक्रार अश्विनी देशभ्रतार हिनेच दिली होती. प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र, मृताच्या वडिलांसह अश्विनी देशभ्रतार हिला दोषी ठरविले. मृताच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर निकाल जाहीर होण्यापूर्वीच अश्विनी फरार झाली होती. तपासादरम्यान ती राज्याबाहेर वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-३ला अश्विनी लावा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले.female accused वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला कळमना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर, पोउपनि अमित देषमुख, अमोल जासुद, विनोद गायकवाड, अनुप तायवाडे, अजय पाटील, दिनेश डवरे, विवेक भोयर, रोहीत काळे, मनिषा रामटेके, मंगेश मेश्राम, अनिल बोटरे, दामिनीच्या पोलिस हवालदार प्रिती थोटे, दिव्या काळे यांनी केली