प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत ९१३ लाभार्थ्यांना ९.१३ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
बुलढाणा
pradhan-mantri-vishwakarma-yojana भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) अंतर्गत राबविण्यात येणार्‍या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या विशेष शिबिरास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १ हजार २४५ लाभार्थींनी सहभाग नोंदविला. यापैकी ९१३ लाभार्थ्यांच्या कर्जप्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी ९ कोटी १३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
 
buldhana photo
 
pradhan-mantri-vishwakarma-yojana  जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या शिबिरास सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक सोहेल अहमद, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक नीरज कुमार, एमएसएमई, नागपूरचे सहाय्यक संचालक मधुकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक प्रमुख पंकज कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, विविध बँकांचे जिल्हास्तरीय अधिकारी तसेच संबंधित समितीचे सदस्य उपस्थित होते.
 
pradhan-mantri-vishwakarma-yojana  यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र पारंपरिक कारागीर, हस्तकला व्यावसायिक व सेवा क्षेत्रातील लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. लाभार्थ्यांना कर्जप्रकरणे, बँकिंग सुविधा तसेच योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध लाभांची माहिती देण्यात आली.
 
pradhan-mantri-vishwakarma-yojana  प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागीर व कौशल्याधारित व्यवसाय करणार्‍या घटकांना आर्थिक सहाय्य, कौशल्यविकास, आधुनिक साधनसामग्री आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना असून, अशा विशेष शिबिरांमुळे लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.