ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची आजच्या पिढीला गरज : संदीप बोरकर

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Lokmanch Senior Citizens' Association लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने ज्येष्ठांचा अमृत महोत्सव व वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठांचे योगदान अमूल्य असून आजच्या पिढीला त्यांच्या अनुभव व मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले.

dipak  
 
 
 
यावेळी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या तसेच वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दीपक शेंडेकर यांनी, तर आभार प्रभाकर सव्वालाखे यांनी मानले. कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र