नागपूर
Lokmanya Convent, Ankur Pre-school लोकमान्य कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यम शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी उत्साहात काढण्यात आली. सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः दिंडी तयार करून सजावट केली. वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडीत सहभाग घेतला, तर लहान विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा साकारली.मुख्याध्यापिका संगीता लाडखेडकर यांनी औक्षण करून दिंडीला प्रारंभ केला. परिसरातील नागरिकांनी रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत व पूजन केले.
सौजन्य:मीनाक्षी देशपांडे ,संपर्क मित्र
अंकुर प्रि-स्कूलमध्ये पांडुरंगाची वारी
महिला कला निकेतन संचालित अंकुर प्रि-स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी पांडुरंगाची वारी उत्साहात साजरी केली. तसेच रा. से. समितीच्या आद्य प्रमुख संचालिका व. मावशी केळकर यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव अॅड. सुफला ताटके, कोषाध्यक्ष आरती आठवले तसेच आर. एस. मुंडले शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका नंदिनी पिंपळापुरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:सुफला ताटके,संपर्क मित्र