गोळीबाराची घटना... नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
पुणे
pune crime शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वैमनस्यातून गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घोरपडे पेठ आणि लोहियानगर परिसरात झालेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.
 

pune crime two firing incidents rock city as police arrest five accused 
पहिली घटना शुक्रवारी सकाळी घोरपडे पेठ पोलीस चौकीजवळील अनुसया टॉवर्ससमोर घडली. पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ख्वाजाउद्दीन नजीर शेख उर्फ नुरु शेख यांच्या नातेवाईकाने काही वर्षांपूर्वी आरोपीच्या वडिलांना मारहाण केली होती. याच जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून दुचाकीवरून आलेल्या सुजल उर्फ चिम्या सुनील परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी नुरु शेख यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. यातील एक गोळी नुरु शेख यांच्या पाठीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दुसरी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोहियानगर परिसरात घडली. जुन्या वादातून तीन हल्लेखोरांनी ओम्या गायकवाड या तरुणाला लक्ष्य करत त्याच्यावर थेट गोळी झाडली. मात्र, सुदैवाने गोळी लक्ष्य चुकल्याने ओम्या गायकवाड हा थोडक्यात बचावला.या दोन्ही प्रकरणांमध्ये खडक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि मुख्य आरोपी सुजल उर्फ चिम्या सुनील परदेशी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या इतर चार साथीदारांनाही अटक करण्यात आली.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुजल उर्फ चिम्या सुनील परदेशी, जय उर्फ पियुष अनिल परदेशी, सोनू उर्फ मॉन्टी अनिल परदेशी, विकी राजू परदेशी आणि नितेश उर्फ बॉबी संतोष रिकीबे यांचा समावेश आहे.या सलग दोन गोळीबाराच्या घटनांमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे.