नागपूर,
Ramkrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारे संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, शिक्षण व स्वराज्याच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. दीपक ठाकरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्यावर, तर प्रा. सुषमा वडस्कर यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:सायली लाखे ,पिदळी,संपर्क मित्र