नागपूर,
Reshimbag Bhajani Mandal आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रेशीमबाग येथील वटेश्वर हनुमान मंदिरात रेशीमबाग महिला भजनी मंडळाच्या वतीने विठ्ठल नामस्मरण व भजनाचा कार्यक्रम भक्तिभावात संपन्न झाला. मंडळातील महिलांनी सुरेल भजनांनी आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या भक्तिमय भजनसंध्येच्या यशस्वी आयोजनासाठी गुरू रश्मी कविश्वर अलोणी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुरेख व भक्तिमय वातावरणात पार पडला.कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरणाचा आनंद घेतला.
सौजन्य:उर्मिला सराफ,संपर्क मित्र