पंढरपूरवरून परतीच्या रेल्वेगाड्या मंजूर

नवनीत राणा यांची मागणी पूर्ण

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
अमरावती
amravati navneet-rana पंढरपूरवरून अमरावती व नागपूरकरिता रेल्वेगाड्या प्रथमच मंजूर करण्यात आल्या आहेत. याचे पूर्ण श्रेय माजी खासदार नवनीत राणा यांना जाते. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेल्या विदर्भातील वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन नवनीत राणा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे २६ व २७ जुलैला पंढरपूर ते अमरावती व नागपूरदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. या संबंधाने मेलवर रेल्वेमंत्री व संबंधित रेल्वेमंत्र्यांनाही पत्र पाठवून त्याप्रमाणे भ्रमणध्वनीवर संवाद सुरू होता.
 
navneet rana
 
amravati navneet-rana या संदर्भात नवनीत राणा यांनी १४ जुलैला रेल्वेमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठवून विदर्भातील हजारो वारकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना परतीच्या प्रवासात होणाऱ्या अडचणींची माहिती दिली होती. तसेच आषाढी एकादशीनंतर परतीसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई येथून २१ जुलैला जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, आषाढी यात्रेदरम्यान वारकऱ्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याकरिता अधिकृत कोचिंग नोटिफिकेशन जारी करून निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदर्भातील, विशेषतः अमरावती व नागपूर परिसरातील हजारो वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
\
amravati navneet-rana भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्या या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेत संबंधित विशेष रेल्वेगाड्यांच्या संचालनास मंजुरी दिली आहे. त्यामुळे विदर्भातील हजारो वारकरी भक्तांच्या परतीचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व आरामदायी होणार आहे. याबाबत वारकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त करीत नवनीत राणा यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.