‘सरस्वती’ची दिंडी संस्कार अन् वारकरी परंपरेची!

विद्याथी रंगलेत विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठलात

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
वर्धा
saraswati-vidya-mandir-wardha शाळेतून पुस्तकी ज्ञानासोबतच विद्याथ्र्यांना संस्कार, संस्कृती, प्रथा, परंपरांचे ज्ञान आणि ते रूजवण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. हीच भावना जपत स्थानिक केळकरवाडी येथील सरस्वती विद्या मंदिर मराठी माध्यम उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने पहिली ते सातवीच्या विद्याथ्र्यांची आषाढी एकादशी औचित्य साधून वृक्षदिंडी आणि विठू माऊलीची पालखी काढण्यात आली.
 
wardha photo
 
saraswati-vidya-mandir-wardha लहानग्यांच्या निरागस चेहर्यांवर विठ्ठलभक्तीचे तेज झळकत होते. कुणी विठ्ठल, कुणी रुक्मिणी, तर कुणी वारकरी होत टाळ-मृदंगाच्या तालावर नामाचा गजर करीत विठ्ठल मंदिराकडे मार्गक्रमण करत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या बाल वारकर्यांनी घेर धरला... फुगड्या खेळल्या!
 
 saraswati-vidya-mandir-wardha  विद्याथ्र्यांच्या हातातील वृक्षरोपे भक्तीचा मार्ग निसर्गासोबत जात असल्याचे सांगत होते. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा असा सुंदर संगम होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार ‘एक पेड माँ के नाम’ असा संदेश विद्यार्थी हातात फलकं घेऊन देत होते. २५ वर्षांपासुनचे
सातत्य राबविणारी शाळा केवळ विद्याथ्र्यांना शिक्षण देत नाही तर वारकरी परंपरेचे, संस्कृतीचे आणि पर्यावरण संवर्धनाचे बीजही रुजवत आहे. विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
saraswati-vidya-mandir-wardha  प्रारंभी पालखीचे पूजन संस्थाध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव संजय जलताडे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यांनी विद्याथ्र्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत अशा उपक्रमांतून भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष मदन परसोडकर, संचालक अनिल निर्मळ, मुख्याध्यापक दिनेश शेंडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.