अंध विद्यालयात आषाढी एकादशीची भक्तिमय दिंडी

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
नागपूर
School for the Blind, Nagpur आषाढी एकादशीनिमित्त अंध विद्यालयात विद्यार्थ्यांना विठ्ठल-रुक्मिणीच्या आकर्षक वेशभूषेत सजवून दिंडी व प्रभातफेरी काढण्यात आली. हरिनामाच्या गजराने विद्यालय परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांनी विठ्ठलभक्तीपर भजनेही सादर केली.

bliend  
 
 
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव नागेश कानगे, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने झाली.
सौजन्य:सुरेश  चव्हारे.,संपर्क मित्र