जिल्हा नियोजन समितीतील लेखाधिकार्‍यास कारणे दाखवा नोटीस

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका सात दिवसांत सुधारणा करण्याचे निर्देश

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
गोंदिया
district-planning-committee gondia जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीत कार्यरत लेखाधिकारी उमेश पंधरे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, 1979 चे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 23 जुलै रोजी ही नोटीस देण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 
planning commeti
 
 
district-planning-committee gondia मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा नियोजन समितीमध्ये लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले उमेश पंधरे यांनी वारंवार महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या कार्यालयीन वर्तनाबाबत अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून, कार्यालयीन कामकाजात विनाकारण अडथळे निर्माण करणे, नकारात्मक शेरा लिहिणे, त्यामुळे कर्मचार्‍यांना अडचणी निर्माण होणे, कार्यालयात तंबाखूयुक्त गुटखा सेवन करून परिसर अस्वच्छ ठेवणे आदी बाबींचा उल्लेख सदर नोटिसात करण्यात आला आहे. याशिवाय, कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित न राहणे, कोणालाही न कळविता कार्यालयाबाहेर जाणे, स्वतःच्या दालनात कंत्राटदारांच्या बैठका घेणे, कार्यालयीन वेळेत शेअर मार्केटमधील ऑप्शन ट्रेडिंग करणे, सहकार्‍यांशी वाद घालणे तसेच कार्यालयात मद्यप्राशन करून आल्याचे आरोपही नोटिसात नमूद करण्यात आले आहेत.
 
district-planning-committee gondia या सर्व बाबींची गंभीर दखल घेत प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांनी उमेश पंधरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत सात दिवसांच्या आत आपल्या वर्तनात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. निर्धारित कालावधीनंतरही सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.