पंढरपुरच्या भक्तिमय वातावरणात जवानांची गोळी झाडून आत्महत्या

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
पंढरपूर
Soldier commits suicide आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. पंढरीत आज भक्तीसागर उसळल्याच पहायला मिळत आहे. परंपरेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा केली
 

Soldier commits suicide 
संपूर्ण पंढरपूर विठ्ठलमय झाले असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. वारीसाठी आलेल्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे पंढरपूरसह पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.रामेश्वर ध्रुपद साबणे असे जीवन संपवणाऱ्या 30 वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास, ज्या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू होती, त्याच सुमारास रामेश्वर यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळ्या झाडून हे टोकाचे पाऊल उचलले.
गोळीबाराचा आवाज होताच परिसरात तैनात असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने रामेश्वर साबणे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांनी ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.