टेस्ट ट्यूब बेबी सेंटर : गौरवशाली प्रवास

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
विशेष,
डॉ. साधना पटवर्धन,

test-tube-baby-center : IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) ही एक आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती आहे, जी वंध्यत्वावर मात करून दाम्पत्यांना पालक होण्यास मदत करते. ही प्रक्रिया सामान्यतः ‘टेस्ट ट्युब बेबी’ म्हणूनही ओळखली जाते. आज जागतिक आयव्हीएफ दिन आहे. त्यानिमित्त...
 
 
K
 
 
 
नागपूरमधील केतकर हॉस्पिटल आणि नागपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर (NTTBC) या संस्थांच्या संस्थापक, संचालक व ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ स्व. डॉ. मंगला केतकर यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ मध्य भारतातील महिला आरोग्य, प्रसूती सेवा आणि वंध्यत्व उपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टी, सेवाभाव आणि वैद्यकीय उत्कृष्टतेमुळे केतकर हॉस्पिटल हे मध्य भारतातील अत्याधुनिक प्रसूती रुग्णालय म्हणून ओळखले जाते. सन २००० मध्ये वाढत्या वंध्यत्वाच्या समस्येची जाणीव ठेवून आधुनिक, सर्वसमावेशक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपचार देण्याच्या उद्देशाने एनटीटीबीसीची स्थापना करण्यात आली. आज एनटीटीबीसी हे मध्य भारतातील जागतिक दर्जाच्या सुविधा, अनुभवी तज्ज्ञांची टीम आणि उच्च यशदरासाठी ओळखले जाणारे अग्रगण्य आयव्हीएफ केंद्र आहे. देशभरातून तसेच परदेशातूनही रुग्ण येथे उपचारासाठी येतात.
 
 
एनटीटीबीसीला सन २००० मध्ये आयएसएआरकडून मानांकन प्राप्त झाले आहे. यांच्या निकषांनुसार केंद्रातील पायाभूत सुविधा, अत्याधुनिक उपकरणे आणि गुणवत्ता व्यवस्थापनाची यशस्वी तपासणी करण्यात आली. ही मान्यता संस्थेच्या उच्च दर्जाच्या सेवा, गुणवत्ता आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोनाची साक्ष आहे. वंध्यत्व उपचार, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, अध्यापन आणि वैद्यकीय सल्लागार सेवा या सर्व क्षेत्रांत एनटीटीबीसीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनुभवी तज्ज्ञांची समर्पित टीम, वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि रुग्णांप्रति असलेली निष्ठा यामुळे एनटीटीबीसी मध्य भारतातील विश्वासार्ह आणि अग्रगण्य आयव्हीएफ केंद्र म्हणून कार्यरत आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ नागपूरवंध्यत्व उपचार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत हजारो दाम्पत्यांच्या आयुष्यात पालकत्वाचा आनंद फुलवला आहे. रुग्णसेवेबरोबरच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनालाही संस्थेने नेहमीच प्राधान्य दिले असून दरवर्षी नियमितपणे वैद्यकीय सेवेंतर्गत कार्यक्रमांचे व चर्चासत्राचे आयोजन केले जाते तसेच ‘फॉग्सी’च्या मान्यताप्राप्त प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे अल्ट्रासोनोग्राफी आणि वंध्यत्व उपचारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
 
 
काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत संस्थेने प्रयोगशाळेत गर्भ सुरक्षित ठेवणाऱ्या आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला असून भ्रूण तपासणी प्रक्रियेसारख्या प्रगत जनुकीय तपासण्यांची सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही संस्था केवळ उपचार केंद्र नसून शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेले अग्रगण्य प्रजनन केंद्र ठरले आहे.
 
 
 
कोणतीही संस्था केवळ एका व्यक्तीच्या कार्यामुळे नव्हे, तर समर्पित आणि कुशल टीमच्या अथक परिश्रमामुळे यशस्वी ठरते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. साधना पटवर्धन, डॉ. सुनीता सोहोनी, डॉ. सुनीता जैस्वाल, डॉ. अश्लेषा पटवर्धन, डॉ. रेणुका पैठणकर, डॉ. अदिती कासवा; भ्रूणशास्त्रज्ञ डॉ. स्वाती ताले, श्रिया फुटाणे, नेहा नवले; परिचारिका श्रद्धा चरडे, निशा सहारे, कुंदा मस्के व प्रशासकीय कर्मचारी अश्विनी वाघ, पल्लवी मोहरील, वैष्णवी ठाकरे अशा संपूर्ण टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे नागपूर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आजही उत्कृष्ट यशस्वितेचे प्रमाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्रित सेवेसह हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट घडवत आहे. संस्थापक स्व. डॉ. मंगला केतकर यांनी रुजविलेली सेवाभाव, गुणवत्ता आणि विश्वासाची परंपरा गेल्या २५ वर्षांपासून याच समर्पित टीमच्या माध्यमातून यशस्वीपणे पुढे सुरू आहे.