बुलढाणा
prataprao-jadhav केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुख्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विठ्ठल चरणी नतमस्तक होत देशातील प्रत्येक नागरिकाला निरोगी व आरोग्यदायी आयुष्य लाभावे, तसेच अन्नदाता बळीराजासाठी भरघोस पाऊस पडून समृद्धी यावी असे साकडे घातले.
prataprao-jadhav आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. या भक्तिरसात रंगलेल्या वातावरणात प्रतापराव जाधव यांनी विठ्ठलाचे दर्शन घेत देशाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी, प्रत्येक नागरिक उत्तम आरोग्य लाभून निरोगी जीवन जगावा आणि शेतकर्यांच्या श्रमाला यश मिळण्यासाठी वेळेवर व समाधानकारक पाऊस व्हावा, अशी प्रार्थना विठ्ठल चरणी अर्पण केली.
prataprao-jadhav बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जातात. कोरोनाच्या दोन वर्षांचा अपवाद वगळता त्यांनी सलग ४३ वर्षे आषाढी वारीत सहभाग नोंदविला आहे. यंदाही त्यांनी विठ्ठल चरणी नतमस्तक होत देशातील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि बळीराजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.