रिसील डॉट इन’चा विदर्भरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
नागपूर
Actress Varsha Usgaonkar ‘रिसील डॉट इन’तर्फे आयोजित विदर्भरत्न पुरस्कार सोहळा नागपूर येथील सालिटेअर बँक्वेट अँड हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते उद्योग, शिक्षण, समाजसेवा, वैद्यकीय, कला, क्रीडा, पत्रकारिता आणि व्यवसाय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

varsha 
 
 
संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीरकुमार पठाडे यांनी विदर्भातील गुणवंतांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा पुरस्काराचा उद्देश असल्याचे सांगितले. हाडगे ब्रदर्सचे संचालक राम रतन हाडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देणारा हा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सौजन्य: अमोल पुसदकर ,संपर्क मित्र