नागपूर ,
Ashadhi Ekadashi Wari आषाढी एकादशीनिमित्त उमरी ते धापेवाडा पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचे अंबिका रेस्टॉरंटजवळ सेवेकरी मित्रपरिवारातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना केळी, फराळी चिवडा, राजगिरा लाडू, चहा व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमात मदनजी डहाके, वासुभाऊ मेंदोळे यांच्यासह सेवेकरी मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.
सौजन्य :धनंजय मुलमुले,संपर्क मित्र