वर्धा,
bharat-gyan-mandir : वर्धा शहरातील भरत भरत ज्ञान मंदिरम्मधील विद्याथ्र्यांसारखे विद्यार्थी संपुर्ण वर्धेत नशिबवान नाहीत. या शाळेला भव्य मैदान आहे आणि तेही मातीचे! त्यामुळे पावसाळ्यात याशाळेतील विद्याथ्र्यांची मज्जा आसते. त्यांना पावसाचा नैसर्गिक आनंद घेता येतो. मैदानातील खोल भागात पावसाचे पाणी साचते. परवा रात्री झालेल्या पावसाचे पाणी पटांगणात साचले आणि आषाढीला चिमुकल्यांच्या वारीचे प्रतिबिंब त्या पावसाच्या पाण्यात दिसु लागले. काही क्षणासाठी छोट्या चंद्रभागेच्या तिरी असा भास होऊ लागला होता.
भरत ज्ञान मंदिरम कॉन्व्हेंट येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्राचार्या मोना सालोडकर व पर्यवेक्षक जयश्री देशमुख यांनी पालखी पूजन करून दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.
शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या दिंडीत विद्याथ्र्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत संत ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. दिंडी शिवाजी चौकात आल्यानंतर विठ्ठलाचा गजर करण्यात आला. पारंपरिक नृत्य व फुगड्यांनी वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी चिमुकल्या विद्याथ्र्यांनी रिंगण घालून विठ्ठलाची प्रतिमा साकारली होती.