जिल्ह्यात पावसाचीही आणि पाण्याचीही तुट

जलाशयही अर्धे कोरडेच

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
rain-and-water-shortages : गेल्या काही वर्षांपासुन जिल्ह्यात पाऊस कमी नाही तर जास्त होतो आणि शेतकर्यांसह सामान्य नागरिकही अडचणीत येतात. यावर्षी असुन अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी, जिल्ह्यातील लहानमोठे १९ धरणं आणि जलायशांमध्ये अध्र्यापेक्षा कमी पाणी जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला पाऊसही निम्माच झाला आहे.
 
 
lk
 
 
यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे वर्धा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९० ते ९२ टक्केच पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला होता. जून नंतर जुलैतही जिल्ह्यात पावसाची तुट कायम असल्याने हवामान विभागाचा हा अंदाज आता खोटा ठरतोआहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसाअभावी जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम जलाशयांतील पाणी पातळीत पाहिले तशी वाढ झालेली नाही.
 
यंदाच्या वर्षी सुरूवातीला पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्याही खोळंबल्या होत्या. नंतर पेरणी पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. जिल्ह्यात सध्या ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सध्या पीक परिस्थिती समाधानकारक आहे. अंकुरलेले कपाशी, सोयाबीन, तूर आदी पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पाऊस बेपत्ताच झाल्याने अंकुरलेल्या पिकांना चांगलीच तडन सोसावी लागली. तर नंतर रिमझिम पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली. तसेच आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. अजूनही मुसळधार पावसाअभावी जिल्ह्यातील मोठे व मध्यम जलाशय निम्म्याहून अधिक रितेच आहेत. परिणामी, शेतकर्यांसह नागरिकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
 
 
जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ७५ टक्केच पाऊस झाला तर जुलै महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ६८.०५ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
 
 
जलाशयांतील पाणी पातळीची स्थिती
 
वडगाव प्रकल्प : २७.११
बोर प्रकल्प : ५९.५६
निम्न वर्धा : ६५.१७
धाम प्रकल्प : ५१.७१
पोथरा प्रकल्प : २४.६२
पंचधारा प्रकल्प : २६.५१
डोंगरगाव प्रकल्प : ३६.१३
लाल नाला : ३१.६७
वर्धा कार नदी प्रकल्प : ६०.५८
सुकळी लघु प्रकल्प : १६.१६
 
२६ रोजीपर्यंत झालेला पाऊस
 
 
वर्धा : ८१.०० टक्के
सेलू : ६३.०८ टक्के
देवळी : ७४.०६ टक्के
आर्वी : ६८.०० टक्के
आष्टी : ७८.०५ टक्के
कारंजा : ७२.०४ टक्के
हिंगणघाट : ५५.०७ टक्के
समुद्रपूर : ६३.०७ टक्के