chaturmas देवशयनी एकादशीला चातुर्मास सुरू झाला आहे, हिंदू धर्मात चातुर्मास हा अत्यंत पवित्र आणि संयम, साधना तसेच ईश्वरभक्तीचा काळ मानला जातो. आषाढ शुक्ल एकादशी (देवशयनी एकादशी) पासून कार्तिक शुक्ल एकादशी (प्रबोधिनी एकादशी) पर्यंतचा हा चार महिन्यांचा कालावधी असतो. या काळात विवाह, गृहप्रवेश, मुंज यांसारखी शुभ आणि मांगलिक कार्ये पारंपरिकरित्या टाळली जातात. यामागे पौराणिक श्रद्धा आणि सामाजिक दोन्ही कारणे आहेत.
chaturmas पौराणिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आणि शुभ कार्यांचे अधिष्ठाता देव मानले जात असल्यामुळे त्यांच्या योगनिद्रेच्या काळात विवाहासारखे मांगलिक विधी न करण्याची परंपरा निर्माण झाली. कार्तिक शुक्ल एकादशीला, म्हणजेच प्रबोधिनी किंवा देवउठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. त्यानंतर विवाहसोहळ्यांना पुन्हा सुरुवात होते.
चातुर्मासात विवाह टाळण्यामागे व्यावहारिक कारणही आहे. हा काळ पावसाळ्याचा असल्याने प्राचीन काळी लांबचा प्रवास करणे कठीण होते. रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे वèहाडी, नातेवाईक आणि पाहुण्यांना प्रवासात अनेक अडचणी येत असत. त्यामुळे मोठे समारंभ टाळून हा काळ धार्मिक साधना आणि आत्मचिंतनासाठी राखून ठेवला जात असे.
आध्यात्मिक साधनेवर भर
chaturmas धर्मशास्त्रांनुसार, चातुर्मास हा व्रत, उपवास, जप, तप, दान, धर्मग्रंथांचे वाचन आणि सात्त्विक जीवन जगण्याचा कालखंड मानला जातो. त्यामुळे सांसारिक उत्सवांपेक्षा आध्यात्मिक साधनेवर अधिक भर दिला जातो. अनेक साधू-संतही या काळात एका ठिकाणी राहून प्रवचन, कीर्तन आणि धर्मप्रबोधन करतात.
शुभ कार्यांना पुन्हा प्रारंभ कधीपासून?
chaturmas चातुर्मासाचा हा काळ मांगलिक उत्सवांपेक्षा ईश्वरभक्ती, संयम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित मानला जातो. प्रबोधिनी एकादशी ज्याला आपण देवउठणी एकादशी म्हणतो. या एकादशीला भगवान विष्णू जागृत झाल्याची श्रद्धा असल्याने विवाह आणि इतर शुभ कार्यांना पुन्हा प्रारंभ केला जातो. देवउठणी एकादशी कार्तिक महिन्याच्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला येते. या दिवशी भगवान विष्णू आपल्या चार महिन्यांच्या योगिक निद्रेतून जागे होतात. पंचांगानुसार, या वर्षी देवउठणी एकादशी 20 नोव्हेंबर 2026 रोजी असेल. या दिवशी चातुर्मास संपेल आणि विवाह तसेच गृहप्रवेश समारंभांसारखे शुभ कार्यक्रम सुरू होतील.
नोव्हेंबर 2026 मधील विवाह मुहूर्त
chaturmas 20 नोव्हेंबर 2026 रोजी देवउठणी (प्रबोधिनी) एकादशीनंतर विवाहसोहळ्यांना पुन्हा सुरुवात होईल. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विवाहासाठी पुढील 4 शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत.
21 नोव्हेंबर 2026 (शनिवार)
24 नोव्हेंबर 2026 (मंगळवार)
25 नोव्हेंबर 2026 (बुधवार)
26 नोव्हेंबर 2026 (गुरुवार)
डिसेंबर 2026 मधील विवाहाचे शुभ मुहूर्त
chaturmas डिसेंबर महिन्यात विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
2 डिसेंबर 2026 (बुधवार)
3 डिसेंबर 2026 (गुरुवार)
4 डिसेंबर 2026 (शुक्रवार)
5 डिसेंबर 2026 (शनिवार)
6 डिसेंबर 2026 (रविवार)
11 डिसेंबर 2026 (शुक्रवार)
12 डिसेंबर 2026 (शनिवार)
वरील तारखा सामान्य शुभ विवाह मुहूर्त दर्शवतात. विवाहासाठी अंतिम मुहूर्त निश्चित करताना वधू-वरांच्या जन्मपत्रिका, नक्षत्र, गोत्र, स्थानिक पंचांग आणि कुलाचार यांचा विचार करून अनुभवी ज्योतिषाचार्यांचा सल्ला घेणे उचित ठरते.
.............