डॉ. संदीप लोंढे,
आजनसरा,
cow-dies-in-accident : आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलनामाच्या गजरात भतीचा महासागर उसळला होता. पण, हिंगणघाटच्या नांदगाव चौक उड्डाणपुलाजवळ एका मुक्या जीवाची अशी वेदना उभी राहिली की ती पाहून प्रत्येकाचे डोळे नकळत पाणावले. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गायीचा मृत्यू झाला. मात्र, तिचा सोबती असलेला बैल २४ तासांपासून तिच्या मृतदेहाजवळून हलायलाही तयार नव्हता. तो पुन्हा पुन्हा तिच्या अंगावर डोके टेकवतो, हंबरतो, जणू म्हणतोय... उठ ना... अजून आपल्याला खूप दूर जायचं आहे! मुया जीवाची ही माया पाहून दगड मनाच्या मानसालाही पाझर फुटावा असे चित्र अनेकांनी कॅमेराबद्ध केले.

आषाढी शुद्ध एकादशीचा म्हणजे पवित्रालाही पवित्र करणार दिवस. सर्वत्र विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल... या नामघोषाने वातावरण भारावले होते. अशा भतिमय दिवशी हिंगणघाटच्या नांदगाव चौक उड्डाणपुलाजवळ घडलेल्या एका अपघाताने मात्र संवेदनशील मनांना खोल जखम दिली. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गौमातेचा जागीच मृत्यू झाला. रताच्या थारोळ्यात पडलेला तिचा निर्जीव देह आणि त्याच्या शेजारी उभा असलेला तिचा जिवलग सोबती बैल.. हे दृश्य पाहणार्यांचे हृदय अक्षरशः पिळवटून टाकत आहे.
गेल्या चोवीस तासांहून अधिक काळ तो बैल त्या मृतदेहापासून एक पाऊलही दूर गेला नाही. अधूनमधून तो तिच्या अंगावर डोके टेकवतो, अलगद हुंगतो, शेपूट हलवतो आणि काळीज चिरून टाकणार्या आवाजात हंबरतो. त्या प्रत्येक हंबरड्यात एकच आर्त हाक दडलेली असल्याचा भास होतो... उठ ना... मी आलोय... आपल्याला एकत्र जायचं आहे... काही वेळाने स्वतःच्या पायाने जमीनही उखरतो. त्या गो मातेच्या अंगावर बसलेल्या माशाही उडवतो.
परिसरातील लोकांनी दिलेल्या माहिती नुसार बैल आणि ती गौमाता नेहमी एकत्रच दिसायचे. रस्त्यावर हिंडणे, अन्न शोधणे, विश्रांती घेणे... त्यांची प्रत्येक वाट एकच होती. पण, नियतीने एका क्षणात त्यांची साथ हिरावून घेतली. मृत्यूने गाईचा श्वास थांबवला असला तरी या बैलाची मैत्री थांबवू शकली नाही. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक नागरिक थांबत आहेत. रस्त्यावरून जाणारे वाहनचालक आणि नागरिक हे दृश्य बघून सुन्न होत आहेत. काहींचे डोळे पाणावले, काहींनी गाईला फुलं वाहून श्रद्धांजली वाहिली. माणूस स्वार्थासाठी नाती तोडतो, पण या मुया प्राण्याने २४ तास उपाशी-तापाशी मृत सोबत्याला दिलेला हा प्रामाणिकपणाचा दाखला आहे. प्राण्यांनाही भावना असतात यापेक्षा मोठं उदाहरण कुठलं असेल? स्थानिक नागरिकांनी गौसेवा संस्थेला आणि प्रशासनाला याबत कळवले असल्याची माहिती मिळाली. पण, तो बैल अजूनही तिचा देह राखतोय. जणू शेवटपर्यंत सोबत निभावण्याची शपथ घेतली असावी.