नागपूर,
Delhi Public School दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान येथील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी प्रिशा नरेंद्र पहाडे हिने छत्रपती संभाजीनगर येथे २५ जुलै रोजी झालेल्या आंतरशालेय महाराष्ट्र राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले.
प्रिशाच्या या यशात शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच वडील नरेंद्र पहाडे, आई पूजा पहाडे आणि आजी निर्मला पहाडे यांचे मोलाचे योगदान लाभले. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून भविष्यातही ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सौजन्य:शंकर पहाडे ,संपर्क मित्र