नागपूर,
Jyotiba Vidyalaya एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय आभा ताई चतुर्वेदी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
सौजन्य:अरुणा कडु ,संपर्क मित्र