आर्वी,
man-ki-baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३६ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या बूथस्तरीय आयोजनांमध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघाने सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आर्वी विधानसभा पुन्हा अव्वल ठरली आहे. विशेष म्हणजे आर्वीच्या या यशाचा सकारात्मक प्रभाव वर्धा जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांवरही दिसून आला असून राज्यातील पहिल्या चार क्रमांकांमध्ये वर्धा जिल्ह्यातील तब्बल तीन विधानसभा मतदारसंघांनी बाजी मारली आहे.
भाजपाच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आर्वी विधानसभा मतदारसंघातील सर्व ३१० बूथवर १०० टक्के मन की बात कार्यक्रमाचे अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तब्बल ५,६०५ नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे विचार ऐकले. आमदार वानखेडे यांनी आखून दिलेली रणनीती, कार्यकत्र्यांशी असलेला थेट संवाद आणि उत्कृष्ट सुक्ष्म नियोजनामुळेच आर्वी विधानसभेला हे यश मिळवता आले आहे.
आर्वी विधानसभेच्या या यशापाठोपाठ हिंगणघाट विधानसभा द्वितीय स्थानावर राहिला येथे ३५० बूथवर १०० टक्के कार्यक्रम झाला. ८,२०० श्रोते तर वर्धा विधानसभा चौथ्या क्रमांकावर राहिला ३१२ बूथवर ९० टक्के उपस्थिती ७,६९१ श्रोते तर देवळी विधानसभा मतदार संघात २,१७७ श्रोत्यांनी कार्यक्रम बघितला.
आमदार सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बूथ स्तरावर मेहनत घेणार्या भाजप कार्यकत्र्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. आपण सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावू शकलो. हा विजय आर्वीतील प्रत्येक बूथ कार्यकत्र्याचा असल्याचे आमदार वानखेडे म्हणाले.
जिल्ह्यातील भाजपातील संघटन मजबूत : गाते
राज्यातील पहिल्या चार क्रमांकांमध्ये वर्धा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणे ही जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. जिल्ह्यातील भाजपाचे संघटन मजबूत असल्याचा हा दाखला आहे. आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा प्रमाणेच पुढे देवळी मतदार संघही स्पर्धेत येईल, असा विश्वास गाते यांनी व्यक्त केला.