गडचिरोली
Maoist Activity नक्षलवाद संपवण्याचा दावा केला जात असतानाच गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या हालचाली पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. भामरागड तालुक्यात माओवाद्यांनी बॅनर आणि पत्रके लावून 26 ते 30 जुलैदरम्यान गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भामरागड तालुका मुख्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हिदूर-दोबूर मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर आणि पत्रके लावली. या Maoist Activity पत्रकांमध्ये जल, जंगल आणि जमिनीच्या मुद्द्यावर संघर्ष करताना शहीद झालेल्या सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.माओवाद्यांच्या या हालचालींची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सतर्कता वाढवली असून घटनास्थळी पोहोचून बॅनर आणि पत्रके जप्त केली आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.गेल्या काही काळात गडचिरोलीतील या भागात नक्षलवाद्यांच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात सुरक्षा दलांना यश आले होते. एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या परिसरात त्यांचे अस्तित्व कमी झाल्याचे चित्र होते. मात्र, आता पुन्हा एकदा माओवादी हालचाली वाढताना दिसत आहेत.
माओवाद्यांनी वाटलेल्या पत्रकांमध्ये 26 जुलै ते 30 जुलै 2026 या Maoist Activity कालावधीत गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात वाढणाऱ्या कंपन्या, पोलीस ठाण्यांची वाढती संख्या आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणाचा मुद्दा या पत्रकांमधून उपस्थित करण्यात आला आहे.तसेच नागरिकांनी जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.