नवी दिल्ली,
mental health जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याच्या समस्यांचा धोका सातत्याने वाढतो आहे. मागील काही दशकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांवरील चर्चा लक्षणीयरीत्या वाढली आहे. ताण, चिंता आणि नैराश्याचा आता तरुण पिढीवरही परिणाम होतो आहे.
आधुनिक जीवनशैली, चांगले उत्पन्न, उत्कृष्ट आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या देशांमध्ये राहत असूनही, लोकांना पूर्वीपेक्षा जास्त मानसिक ताण जाणवत आहे. युरोपमध्ये ब्रिटन हा सर्वाधिक मानसिक ताण असलेला देश आहे, असे एका अभ्यासात समोर आले आहे. जवळपास प्रत्येक तीन ब्रिटिश नागरिकांपैकी एक जण मानसिक आरोग्याबद्दल चिंतित आहे. मोठ्या संख्येने लोक नैराश्य, चिंता आणि दीर्घकालीन ताण यांसारख्या समस्यांशी झुंज देत आहेत. अहवालानुसार, वेगाने बदलणारे जग, भविष्याबद्दलची असुरक्षितता, आर्थिक दबाव, वाढती महागाई आणि एकाकीपणा यांचा लोकांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम होतो आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, लोक डॉक्टरांना आपल्या समस्या सांगण्याऐवजी अधिकाधिक प्रमाणात एआय चॅटबॉट्सवर अवलंबून राहत आहेत, असा एक कल दिसून येत आहे. तज्ञांच्या मते हे धोकादायक असू शकते आणि अनेक प्रकरणांमध्ये, एआयची मदत मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक वाढवू शकते. सुमारे १८ देशांमधील मानसिक आरोग्याच्या विश्लेषणातून ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरियासारखे विकसित देश मानसिक आरोग्याच्या समस्यांनी सर्वाधिक त्रस्त आहेत, तर थायलंड आणि स्वित्झर्लंडसारखे देश उत्तम मानसिक आरोग्यासह यादीत अव्वल आहेत, असे दिसून आले.
भारतीय लोकसंख्या देखील mental health मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात मानसिक आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत असून सार्वजनिक आरोग्य संकट झाले आहे. भारतातील अंदाजे १५ टक्के प्रौढांना मानसिक आरोग्याच्या उपचारांची आवश्यकता आहे, ज्यात नैराश्य आणि चिंता या सर्वात सामान्य समस्या आहेत.
४० टक्के लोक ठेवतात एआयवर विश्वास
या अहवालात आणखी एक mental health मनोरंजक पण चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. ब्रिटनमधील अनेक लोक मानसिक आरोग्य तज्ञाचा सल्ला घेण्याऐवजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चॅटबॉट्सकडून मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल सल्ला घेत आहेत. एआय कधीकधी चुकीचा सल्ला देऊ शकते, आजाराचे अचूक निदान करण्यात अयशस्वी होऊ शकते. सुमारे ४६ टक्के ब्रिटिश प्रतिसादकर्त्यांनी मानसिक आरोग्याच्या सल्ल्यासाठी एआय चॅटबॉटचा वापर केला असल्याचे सांगितले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पाचपैकी दोन लोकांनी सुमारे ४० टक्के लोकांनी ते मानसिक आरोग्याच्या बाबतीत तज्ञ डॉक्टर किंवा समुपदेशकापेक्षा एआयवर जास्त विश्वास ठेवतात, असे सांगितले.