मिलिटरी स्कूलचा प्रवीणचे फायरिंगमध्ये राष्ट्रीय प्रावीण्य

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
पुलगाव,
praveen-kulal : स्थानिक इंडियन मिलिटरी स्कूलचा एनसीसी द्वितीय वर्षाचा प्रवीण सखाराम कुलाल (थल सेना कॅम्प) मध्ये फायरिंग या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
 
 
jlk
 
 
 
एनसीसी मार्फत दरवर्षी थल सेना कॅम्प देशभरात आयोजित करण्यात येतो. यामध्ये फायरिंग, हेल्थ अॅण्ड हायजिन ऑफस्टॅकल, मॅप रीडिंग यासारख्या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धांमधील फायरिंग या प्रकारात बटालियन, नागपूर ग्रुप व महाराष्ट्र राज्यस्तरावर प्रवीण कुलाल याने उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. यामध्ये निवड झालेले विद्यार्थी २६ जानेवारी २०२७ रोजी दिल्ली येथे होणार्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या कामगिरीमुळे त्याने आपल्या शाळेचे, २१ महाराष्ट्र बटालियन वर्धा, नागपूर ग्रुप तथा महाराष्ट्राचे नाव उंचावलेले आहे. याबद्दल शाळेचे अध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, कमांडंट के. एस. पाटील, मुख्याध्यापक रविकिरण भोजने, पर्यवेक्षक नितीन कोठे, एनसीसी अधिकारी प्रवीण शेळके यांनी त्याचे अभिनंदन केले.