काठमांडू
nepals-anti-india-move नेपाळची मध्यवर्ती बँक, नेपाळ राष्ट्र बँकेने (एनआरबी) नवीन १ रुपयाचे नाणे जारी करणार असल्याची घोषणा केली. या नाण्यावर नेपाळचा वादग्रस्त नकाशा असेल, ज्यामध्ये लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे भाग दर्शवले आहेत. पंतप्रधान बालेन शाह यांच्या आदेशावरून बॅंकेने ही घोषणा केल्याने द्विपक्षीय संबंधात तणाव येण्याची शक्यता आहे. भारताने या वादग्रस्त नकाशावर यापूर्वीच आक्षेप घेतला आहे.
nepals-anti-india-move यावर्षी, नेपाळने लिपुलेख खिंडीमार्गे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावरून भारत आणि चीनकडे आक्षेप नोंदवला होता. तथापि, भारताचा दावा आहे की हे तीनही भाग त्याच्या उत्तराखंड राज्याचा भाग आहेत आणि हा प्रश्न परस्पर संवादाने सोडवला पाहिजे. मे २०२० मध्ये, तत्कालीन केपी शर्मा ओली सरकारने नेपाळच्या अधिकृत नकाशात या भागांचा समावेश केला होता. आता बालेन सरकारनेदेखील ओली सरकारचे धोरण राबवण्याचा अट्टाहास करत आहे. अशातच नेपाळ राष्ट्र बँकेचे प्रवक्ते गुरु प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, एनआरबीला अद्याप नवीन नाण्याचे डिझाइन अधिकृतपणे मिळालेले नाही, परंतु आम्हाला खात्री आहे की त्यावर नकाशा असेल. आम्ही एक नवीन १ रुपयाचे नाणे जारी करणार आहोत. त्याचा आकार आणि धातू बदलला जाईल, ज्यामुळे ते पूर्वीच्या नाण्यापेक्षा लहान आणि हलके होईल.
मठाचे चित्र लावण्यास मंजुरी
nepals-anti-india-move नेपाळमधील १ रुपयाच्या नाण्याचा मुद्दा तापल्यानंतर २० जुलै रोजी पंतप्रधान शाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या (आरएसपी) सरकारने नाण्यावरील नेपाळच्या नकाशाऐवजी एका मठाचे चित्र लावण्यास मंजुरी दिली. या पुनर्रचनेनुसार, नाण्यावरील वादग्रस्त नकाशा काढून त्या जागी लो घायकर मठाचे चित्र लावण्यात येणार होते. मात्र आठवडाभरातच त्यांनी कोलांटउडी घेत वादग्रस्त नकाशाचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.