नागपूर ,
Pandit Bachraj Vyas Vidyalaya पंडित बच्छराज व्यास विद्यालय (इंग्रजी माध्यम) येथे विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रात्यक्षिक निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवरील प्रतीकात्मक ईव्हीएमद्वारे मतदान करून आपल्या हाऊसचे प्रतिनिधी निवडले.
प्रत्येक हाऊसमधून दोन मुले व दोन मुली असे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सुमारे २०० विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेतला. निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून संकेत वानखेडे व अंजू गहुकर यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अशा उपक्रमांमुळे लोकशाही मूल्ये अधिक दृढ होतात, असे सांगितले.
सौजन्य: रोहिणी जोशी ,संपर्क मित्र