वर्धा,
pankaj-bhoyer : नगर परिषदेच्या वतीने एक कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात येत असलेल्या इसाजी ले-आऊट मधील नमो उद्यानाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भेट देऊन पूर्णत्वास येत असलेल्या कामांची पाहणी केली.
यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुख्याधिकारी विजय देशमुख, नगर परिषदेच्या बांधकाम सभापती राखी पांडे, नगरसेवक निलेश किटे उपस्थित होते. राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नमो उद्यान योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक नगर परिषद क्षेत्रात नमो उद्यान तयार करण्यात येत आहे. यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. १ कोटी खर्च करुन पर्यावरणीय हरीत संकल्पनेवर आधारीत तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे उर्वरीत काम तात्काळ पूर्ण करा. शहरातील नागरिकांना उद्यानामध्ये चांगल्या सोईसुविधा निर्माण करुन द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी उद्यानात सुरू असलेल्या व पुर्ण झालेल्या कामांची पाहणी केली.