पेलेट गनसह इलेक्ट्रिक शॉक शस्त्रांवर बंदी

नाटो प्रोटोकॉलचे पालन केले जाईल

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
electric shock विद्यार्थी आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेल्या सीआरपीएफच्या विशेष तुकडी, रॅपिड ॲक्शन फोर्सने (आरएएफ) पेलेट गनच्या वापरावर बंदी घातली आहे. दिल्लीतील तैनातीदरम्यानच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. परिणामी, पुढील आदेश येईपर्यंत पेलेट गन, दंगलविरोधी बंदुका, इलेक्ट्रिक शॉक उपकरणे आणि इलेक्ट्रिक शील्ड्स वापरल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश आरएएफच्या महानिरीक्षकांनी दिले़
 

raf bans pellet guns and electric shock weapons during protest duty in delhi 
महानिरीक्षकांनी स्पष्ट निर्देश दिले की, ही उपकरणे आरएएफ जवानांना दिली जाणार नाहीत. या संदर्भात उच्च स्तरावरून निर्देश जारी केले जातील़ त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल़ दरम्यान, सीआरपीएफ आणि आरएएफच्या १६ अतिरिक्त कंपन्या हवाई मार्गाने दिल्लीत दाखल केल्या जात आहेत. निमलष्करी दलाच्या ४५ कंपन्या आधीच दिल्लीत तैनात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शस्त्रे वापरताना नाटो प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. संसद मोर्चादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापराबाबत संयुक्त राष्ट्रांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरासह मानवाधिकार उल्लंघनाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिस आणि आरएएफने केलेल्या कठोर कारवाईविरोधात विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी जनक्षोभ व्यक्त केला आहे. आरएएफकडून पेलेट गनचा वापर हा एक ज्वलंत मुद्दा बनला आहे.