मुंबई
ramayana trailer leak गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक भव्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘छावा’, ‘धुरंधर’चे दोन भाग, ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांची नजर अभिनेता रणबीर कपूर स्टारर बहुप्रतीक्षित ‘रामायण’ या सिनेमावर आहे. मात्र, अधिकृत प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
‘रामायण’चा ट्रेलर नियोजित वेळापत्रकानुसार 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे तो रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रेलरच्या नव्या प्रदर्शन तारखेची लवकरच घोषणा करण्यात येईल, असे सांगितले होते. पण ही घोषणा होण्याआधीच चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइन लीक झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर लीक झालेला ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भगवान राम, रावण आणि इतर प्रमुख पात्रांची झलक पाहायला मिळत आहे. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, हा पूर्ण ट्रेलर नसून केवळ अर्धवट भाग लीक झाला आहे. त्यामुळे अधिकृत आणि पूर्ण ट्रेलरसाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘रामायण’बाबतची उत्सुकता तेव्हाच वाढली होती, जेव्हा दिल्लीमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरचा पहिला लॉन्च सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काही निवडक लोकांनाच ट्रेलर पाहण्याची संधी मिळाली होती. मात्र, काही जणांनी संयम न राखता तो सोशल मीडियावर लीक केल्याचे सांगण्यात येत आहे.
लीक झालेल्या ट्रेलरमध्ये अभिनेता यश पहिल्यांदाच रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. एका भव्य युद्धदृश्यात रावण भगवान इंद्राचा हत्ती ऐरावत याला एका प्रहारात पराभूत करताना दिसतो. यशचा रावण अवतार अत्यंत प्रभावी आणि भव्य स्वरूपात दाखवण्यात आला आहे.
यानंतर रणबीर ramayana trailer leak गे कपूरचा भगवान रामाच्या भूमिकेतील प्रवेश दाखवण्यात आला आहे. त्यानंतर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसते. ट्रेलरच्या शेवटी रकुल प्रीत सिंग शूर्पणखेच्या भूमिकेत दिसते, जिथे जंगलातील प्रसंगात लक्ष्मण तिचे नाक कापताना दाखवण्यात आले आहे.ट्रेलरमध्ये श्रीराम आणि सीतेच्या स्वयंवराचा प्रसंगही दाखवण्यात आला असून, त्यात राम पिनाक धनुष्य उचलताना दिसत आहेत. भव्य सेट, युद्धदृश्ये आणि कलाकारांचे लूक यामुळे हा ट्रेलर चर्चेचा विषय ठरला आहे.मात्र, लीक झालेल्या ट्रेलरची व्हिडिओ गुणवत्ता चांगली नसल्याने प्रेक्षक आता निर्माते अधिकृत आणि उच्च दर्जाचा ट्रेलर कधी प्रदर्शित करणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.