सरस्वती विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
Saraswati Vidyalaya, Nagpur शंकरनगर येथील सरस्वती विद्यालय उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कारगिल युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रहार मिलिटरी स्कूलच्या कॅडेट्सनी पॉवरपॉइंट सादरीकरणातून कारगिल युद्धाचा इतिहास आणि भारताच्या विजयाची गाथा उलगडली. एनसीसी एअर विंगच्या कॅडेट्सनी देशभक्तिपर भाषणे, गीते आणि कविता सादर करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवली.

anu 
 
 
मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश यांनी स्वयंशिस्त, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माणात जबाबदार नागरिकांची भूमिका अधोरेखित केली. उपमुख्याध्यापिका शैली अय्यर यांनी कॅडेट्सच्या कार्याचे कौतुक केले.दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष टी. के. वेंकटेश व सचिव व्ही. मीनाक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक रवींद्र कुलकर्णी, राहुल घोडे आणि एनसीसी एअर विंगचे ए.एन.ओ.-II अधिकारी निलेश धवड यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मेघा व्यास यांनी केले.
सौजन्य:अनघा पेंडके,संपर्क मित्र