श्रीक्षेत्र नारायणपूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणावार

६० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण, ४० लाखांची घोषणा

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
समुद्रपूर, 
sameer-kunawar : तालुक्यातील नारायणपूर येथील पुरातन गोपाळकृष्ण देवस्थान येथे शनिवार २५ रोजी आषाढी एकादशीच्या पर्वावर आ. कुणावार यांच्या प्रयत्नाने उपलब्ध निधीतून निर्माण करण्यात आलेल्या मुख्य प्रवेशद्वार, सभागृहाच्या ६० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. सोबतच सभा मंडपासाठी आणखी ४० लाखांची घोषणा करीत श्रीक्षेत्र नारायणपूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आ. समीर कुणावार यांनी दिले.
 
 

k 
 
 
 
याप्रसंगी जिपच्या माजी सदस्य शुभांगी डेहणे, सरपंच चित्रा पुसदेकर, देवस्थान समितीचे सचिव ज्ञानेश्वर पुसदेकर, मंदिर कमिटीचे सदस्य, गावकरी व भाविक उपस्थित होते.
 
यावेळी आ. कुणावार यांनी पांडुरंगाचे दर्शन घेत विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर गोरगरिबांच्या कल्याणासाठी प्रभू चरणी प्रार्थना केली. यावेळी शुभांगी डेहने, चित्रा पुसदेकर, ज्ञानेश्वर पुसदेकर यांनी सभा मंडपाच्या उर्वरित बांधकामासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता त्यांनी सभा मंडपासाठी आणखी ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
 
 
याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव संजय डेहणे, विधानसभा प्रमुख वामन चंदनखेडे, हेमंत राऊत, तालुकाध्यक्ष शेषराव तुळणकर, विनोद विटाळे, अशोक पुसदेकर, प्रल्हाद पुसदेकर, देवेंद्र गरड, रमेश तांदूळकर, माजी सरपंच युवराज तांदूळकर, आदींची उपस्थिती होती.