नागपूर,
Smt. Dadibai Deshmukh School आषाढी एकादशीनिमित्त श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, महाल येथे विद्यार्थिनींच्या सहभागातून पारंपरिक दिंडी उत्साहात काढण्यात आली. वारकरी वेशभूषेतील विद्यार्थिनींनी टाळ, मृदुंग, भगवे ध्वज आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमांसह भक्तिमय गजर करत परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला.
या उपक्रमातून विद्यार्थिनींना संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. मुख्याध्यापिका माया बमनोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. संस्थेच्या अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस यांनी बाल वारकरी व विठू माऊलीच्या वेशातील विद्यार्थिनींचे कौतुक केले.
सौजन्य:माया बमनोटे,संपर्क मित्र