विद्यार्थ्यांनी साकारला विठ्ठल-रुक्मिणीचा देखणा साज

आषाढी एकादशीनिमित्त उत्तमराव देशमुख स्कूलचा उपक्रम

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
beautiful-scene-of-vitthal-rukmini : आषाढी एकादशीनिमित्त उत्तमराव देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी तसेच वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या वेशभूषेत आकर्षक भूमिका साकारत उपस्थितांची मने जिंकली.
 
 
 
y26July-Upakram
 
 
 
विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनमोहक अभिनयातून आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी परंपरा आणि भक्तीचा संदेश प्रभावीपणे सादर केला. टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषाने आणि विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.
 
 
या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि सांस्कृतिक जाणिवेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
 
 
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगत संत परंपरेतील विचारांचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, नैतिक मूल्ये आणि भक्तीभावाची जोपासना होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.