नागपूर,
Success Point School सक्सेस पॉइंट स्कूल येथे लोककल्याण समिती, विवेकानंद मेडिकल मिशन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५५ विद्यार्थ्यांची नेत्र, दंत व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. प्राचार्या अरुणा किरणापुरे व उपप्राचार्या कल्पना कलनाके यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
सौजन्य:रोशनी नवघरे ,संपर्क मित्र