‘फसव्या’ ब्युटी प्रॉडक्ट्सवर तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका!

१५ हून अधिक उत्पादनांवर बंदी, मोठा साठा जप्त

    दिनांक :26-Jul-2026
Total Views |
मुंबई
tukaram-mundhe तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात सुरू झालेल्या धडक मोहिमेमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या स्टाईलने राज्यात कुठेही भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे, तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणतेही उल्लंघन करणाèयांचे दाबे दणाणले आहेत.

mundhe 
 
tukaram-mundhe अशातच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सौंदर्य प्रसाधनांवरही कारवाईचा धडाका सुरु केला आहे. यावेळी राज्यभरात विकल्या जाणाèया अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये पारा आणि शिशाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून आल्याने एफडीएने मोठी कारवाई सुरू केली आहे.
tukaram-mundhe या कारवाई दरम्यान एफडीएने १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनावर मोठी कारवाई केली आहे. यात उत्पादने निकृष्ट दर्जाची असून त्यांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत. पारा आणि शिसे असलेल्या क्रीममुळे त्वचेची जळजळ, लालसरपणा, पुरळ, त्वचा पातळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे एफडीएने ग्राहकांना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.